Hanuman Sena News

विश्व हिन्दू परिषद बजरंगदल तर्फे गोपाअष्ठमी उत्सव साजरा...

मलकापुर : शहरातील  सालीपुरा या भागामध्ये येथील श्री महादेव मंदिर येथे  गोपाअष्ठमी उत्सवाचे  आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दला मार्फत करण्यात आले  होते.यावेळी सालीपुरा भागातील स्थानिक उपस्थित हिन्दू बांधवा कडून प्रभु श्री राम, श्री महादेव तसेच  भारत मातेच पूजन माल्याअर्पण करण्यात आले.तर दिप प्रज्वल जिल्हा सहमंत्री श्रीकृष्ण तायडे , बजरंग दल प्रखंड संयोजक दीपक कपले व नगर  मंत्री शामसिंह हजारी यांच्या हस्ते करण्यात आले.बजरंगदल नगर सहसयोजक केशव किंन्होळकर यांनी यावेळी  सांगितले की भगवान श्रीकृष्ण गाई  चारण्यासाठी रानामध्ये  पहिल्यांदा   घेऊन गेले होते. आणि याच दिवसापासून भगवान श्रीकृष्ण नेहमी गाई रानात चारायला जायचे. म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून याच दिवसाला गोपाष्टमी असे म्हणतात.  गाय व गौवंश यांचे महत्त्व सांगताना  ते म्हणाले प्राचीन काळापासून भारतात गाय ही प्रामुख्याने दूध, दही, ताक, लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच शेतीकरिता उपयुक्त पशुवंश वाढीसाठी  पाळत आहे. गाय व गोमूत्र हिंदू धर्मात पवित्र मानले गेले आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला गोमाता म्हंटले जाते. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र (गोमूत्र) हे एक औषधी द्रव्य आहे, असे गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो. गाईपासून असंख्य आजारा बरे होत आहे. हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध करून दाखवले आहे. गौवशच्या शेनाचा  उपयोग शेतकरी यांना शेनखत म्हणुन उपयोग होतो प्रतेक शेतकरी  यांनी एक गाई  वागवावी व प्रतेक हिन्दू यांनी गौमातेचे  रक्षण  करावे हा अनुरोध उपस्थित हिन्दू बांधवाना केला संघटन कार्या विषय मलकापुर प्रखंड उपाध्यक्ष उमेश बैरागी यांनी माहिती दिली. नंतर उपस्थित नागरिका द्वारे गाई व वासरु यांचे  पूजन  करण्यात आले या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद जिल्हा सह मंत्री श्रीकृष्ण तायडे, बजरंग दल प्रखंड संयोजक दीपक कपले, विश्व हिंदू परिषद प्रखंड उपाध्यक्ष बबलू बैरागी, विश्व हिंदू परिषद आखाडा प्रमुख ईश्वर सिंह दीक्षित, मंगल सिंह राजपूत बजरंग दल खंड प्रमुख  रवी जवरे यांचे सह स्थानिक नागरिक, माता भगिनी शेकडोच्या संखेत उपस्थितित होते.

Post a Comment

أحدث أقدم