मुंबई: पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०२ दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते.संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर त्यांना आज जामीन मंजूर केला आहे.संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने लेखी उत्तर सादर केले होते. जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी आज 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय दिला आहे.संजय राऊतांना जामीन मंजूर झाला, मात्र आता ३ वाजता आणखी एक महत्वाचा निर्णय पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. रात्री उशिरापर्यंत संजय राऊत यांना सोडण्यात आले. असंख्य कार्यकर्ते ऑर्थर जेल रोडवर त्यांच्या स्वागतासाठी गर्दी करून उभे होते.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق