Hanuman Sena News

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचा बुलढाण्यात आज एल्गार मोर्चा...





बुलढाणा: आज दिनांक 6 रविवार रोजी एल्गार मोर्चात सहभागी होऊन बळीराजाला हिम्मत द्या. एक दिवस आपल्या अन्नदात्यासाठी आपण दिला पाहिजे.आपल्या ताटातला अन्नाचं कण शेतकऱ्यांच्या घामाने पिकला आहे. प्रत्येक घासाला शेतकऱ्याच्या श्रमाचा वास आहे परंतु हाच जगाचा पोशिंदा चोहोबाजूने संकटात आहे अशावेळी गावगाड्यातील शेतकऱ्यांना आधार देणे त्याला पाठबळ देणे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे एल्गार मोर्चाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या गावगाड्यातील शेतकऱ्यांना साथ द्या त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्यासोबत मोर्चात सहभागी व्हा एक दिवस आपल्या अन्नदात्यासाठी द्या असे भावनिक आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे शहरवासीयांना आवाहन करताना रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की दररोज आपण जे अन्न खातो ते शेतकऱ्याच्या प्रचंड परिश्रमातून निर्माण होते शेतकऱ्यांनी अन्न पिकवणे. बंद केले तर आपण काय खाणार अजून तरी टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यांमध्ये अन्न निर्मितीची सोय झालेली नाही, अन्नधान्य निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित झालेल नाही. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही आणि देश सुद्धा टिकू शकत नाही. मात्र हाच बळीराजा आता संकटात आहे अतिवृष्टीने त्यांच्या पिकाच प्रचंड नुकसान झालेला आहे जे पीक वाचलं त्याला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव राहिलेला नाही .यावर्षी तर सोयाबीन कापसाचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही अशी अवस्था आहे सोयाबीनच्या एका क्विंटलला उत्पादन खर्च 6000 रुपये तर मिळणारा भाव 4000 आणि कापसाच्या एका क्विंटलचा उत्पादन खर्च 8500 रुपये तर बाजारात कापसाला भाव फक्त 6000 ते 7000 रुपये आहे त्यामुळे शेतकरी आज तोट्यात आला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी घेरला गेला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उमरठ्यावर उभा आहे .गेल्या काही महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचा आकडा सतत वाढत आहे ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे शेतकऱ्यांचा आता सर्वांवरील विश्वास उडालेला आहे. आज बळीराजा एकाकी पडलेला असताना त्याला तुमच्या साथीची गरज आहे. अशावेळी आपण आपल्या अन्नदात्याला शेतकऱ्याला आधार देण्याची नितांत गरज आहे. त्याला पाठबळ देणे आधार देणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, नोकरदार, व्यापारी,विचारवंत ,साहित्यिक, दुकानदार अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांनी बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे रविवारी 6 नोव्हेंबर रोजी बळीराजाची फौज आपल्या घामाचे दाम मागण्यासाठी मोठ्या संख्येने बुलढाण्यात दाखल होत आहे राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आपल्या बुलढाणातून होत आहे या बळीराजाच्या स्वागतासाठी सन्मानासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती देण्यासाठी एल्गार मोर्चा सहभागी व्हा व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आधार द्या तुम्हा शहरवासीयांच्या आधाराची शेतकऱ्यांना प्रचंड आवश्यकता आहे .तुमची पाठीवरची थाप आणि एल्गार मोर्चातली साथ त्याला जगण्याची उभारी देणार आहे .या यलगार मोर्चात सहभागी होऊन बळीराजाला हिम्मत द्या एक दिवस आपल्या अन्नदात्यासाठी आपण दिला पाहिजे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم