मलकापूर: बुलढाणा शहर व इतर ठिकाणावरून मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असताना नव्याने जिल्हात रुजू झालेले पोलीस अधीक्षक श्री सारंग आव्हाड यांनी सर्व पोलीस अधिकारी यांना सदर गुन्हेगाराबाबत माहिती काढून घडलेले गुन्हे उघडकिस आणून गुन्हे प्रतिबंधक करणे बाबत सूचना दिल्या असतांना मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि.विजयसिंह राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली की, बुलढाणा व चिखली परिसरातून चोरी होणाऱ्या गाड्या मलकापूर येथे आणण्यात येत आहेत, वरून त्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे डिबी पथकाचे इन्चार्ज स.पो.नि सुखदेव भोरकडे यांना माहिती देऊन सदर गाड्या बाबत व गुन्हेगाराबाबत गोपनीय माहिती काढण्याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे पडताळणी करत असताना सोहेल परवेज काजी आनिसोद्दीन, राहणार मोहनपुरा मलकापूर यांच्याकडे असलेल्या गाडीचे कागदपत्र व गाडीवरील चेचिस नंबरची खात्री केली असता ,ते बनावट असल्याचे समजले वरून त्यांनी मोटरसायकल पोलीस स्टेशनला आणून फिर्याद दिल्यावरून अप.नं 456/2022 कलम 420, 465 ,468, 471,120 ब भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर गुन्ह्यात मोसा हा गाडी विक्रीचा मध्यस्थि करणारा होता. मोहम्मद जावेद शेख आयुब व त्याचा मित्र शोएब खान बिस्मिल्ला खान दोन्ही राहणार अहमदशाहापूरा परपेट मलकापूर हे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व सदर गाड्या बुलढाणा शहर व इतर ठिकाणावरून चोरून बनावट कागदपत्र तयार करून विक्री करीत असल्याचे सांगितले. 1) सै. समीर सै. युसुफ 2 ) सै. शकील सै युसुफ डॉन खडकी तालुका मोताळा 3 ) आकाश हरी राठोड हे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसांची मदत घेऊन सै. शकिल डाॅन आणि आकाश राठोड यांना रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे. असे चार आरोपी अटक करण्यात आले असून त्यांचा पीसीआर घेऊन आरोपींकडून आज पोहतो बनावट कागदपत्र तयार करून विक्री केलेल्या 3,75,000 हजार रुपये किमतीच्या खालील प्रमाणे सहा गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. पांढऱ्या रंगाची स्कुटी MH28BR4034, काळ्या रंगाची सिल्वर पट्टी असलेली स्प्लेंडरMH28AK4303, पांढरा रंगाचे एक्सेस स्कुटीMH034247, लाल काळा रंगाची पल्सरMH28AK8863, पांढऱ्या रंगाची एक्सेस स्कुटीMH28BL7162, काळ्या रंगाची पल्सरMH28AW 5118 नमूद आरोपींनी कबुलीमध्ये बनावट दस्तावेज आरसी बुक आधार कार्ड, स्टॅम्प पेपर आधी तयार करणारे मास्टरमाईंड सै. समीर युसुफ व त्याचा भाऊ सै.शकील सै. युसुफ डाॅन हे असल्याचे निष्पन्न झाले हे दोघे व आकाश राठोडे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मोटार सायकल चोरी, घोरपडी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत यामध्ये मोठे राकेट असून मुख्य आरोपी सै.समीर सै.युसुफ लवकरच ताब्यात घेऊन गुन्हाची अधिक उकल करण्यात येत आहे. सदरची कारवाई मा. सारंग आवाड पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्रावण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव ,मा. अभिनव त्यागी ,उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी विजयसिंह राजपूत व सपोनि सुखदेव बोरकडे तसेच पो.हे.काॅ भगवान मुंडे ,पो.का.गोपाल तारुळकर,पो.का. ईश्वर वाघ, पो. का. असिफ शेख ,पो. का.सलीम बर्डे, पो.का. प्रमोद राठोड, पो.का गोपाल इंगळे यांनी केली आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनकडून यापूर्वी वर्षभराच्या कालावधीत एकूण 36 मोटरसायकल जप्त करण्यात आले असून त्यावर मलकापूर शहर ,बुलढाणा, जळगाव, अकोला ,औरंगाबाद जिल्ह्यातील 15 पेक्षा जास्त मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. व त्याचप्रमाणे सतत कारवाई सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. सुखदेव भोरकडे करीत आहेत.
तसेच पो.नि. विजय सिंग राजपूत यांनी जनतेला आव्हान केले आहे की आपण खरेदी केलेल्या गाड्यांचे कागदपत्राची खात्री करावी, वाहनांचे कागदपत्र व गाडीवरील चेचेस नंबर पडताळून पहावा चुकीचा आढळल्यास पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे आवाहन केले आहे.
إرسال تعليق