नांदुरा: वाढदिवस म्हटलं म्हणजे आनंदाचा दिवस प्रत्येकजन आपला वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त करतो. परंतु वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत मात्र आपल्याला फरक जाणवतो. आज २५ नोव्हेंबर म्हणजेच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष व तंत्रशिक्षण समिती अध्यक्ष भूमिपुत्र श्री.प्रतापरावजी जाधवसाहेब यांचा आज वाढदिवस! या औचित्याने बाळासाहेबांची शिवसेना नांदुरा शहर व तालुका यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा शेंबा येथे सकाळी ११ वाजता वह्या व पुस्तकांसह शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच डिघी येथे सुद्धा जिल्हा परिषद शाळेवर वह्या व पुस्तकांसोबतच शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या काही दिवसात वाढत्या थंडीचा प्रादुर्भाव बघता गरीब-अनाथ वृद्धांना थंडीचा बराच त्रास जाणवत आहे वृद्धांचा वाढत्या थंडीपासून बचाव व्हावा यासाठी दहिगाव येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. काही अनाथ व दीन -दुबळे असलेले व रेल्वे स्टेशन, बस स्थानक, इतर सार्वजनिक ठिकाणांवर राहून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्ती सुद्धा वाढत्या थंडीला बळी पडत आहेत, या अनुषंगाने या दीन लोकांनासुद्धा ब्लॅंकेट चे वाटप नांदुरा रेल्वे स्टेशन येथे संध्याकाळी ५.०० वाजता करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके सोबतच शालेय उपयोगी वस्तू मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील चकाकी,आनंद, तसेच वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावरील हास्य तसेच दीन व अनाथ लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद व प्रेम सर्वांना बघायला मिळाले.यावेळी मा.संतोष डिवरे -शिवसेना उपजिल्हाप्रमुख बुलढाणा
मा.सुनिल जुनारे-शिवसेना तालुकाप्रमुख
मा.अनिल जांगळे-शिवसेना शहर प्रमुख
मा .नंदकिशोर खोदले-उपजिल्हाप्रमुख युवा सेना
मा.गजानन करांगळे-शिवसेना उपतालुकाप्रमुख
मा. संदीप पाटील-शिवसेना उपतालुकाप्रमुख
मा. सुभाष गवळी-शिवसेना उपतालुकाप्रमुख
मा. संतोष लाहुळकार -शिवसेना उपतालुकाप्रमुख
मा. विष्णू घनोकार-शिवसेना उपतालुकाप्रमुख
मा. रवी इटखेडे-शिवसेना नेते नांदुरा
मा.राम पांडव-शिवसेना तालुका संघटक
मा. बाळू पाटील-मार्केट कमिटी प्रशासक
मा. अर्जुन तांगडे शिवसेना प्रवक्ता विधानसभा मलकापूर
मा. पंडित बिचारे युवासेना तालुकाप्रमुख
मा. राज सुसरे (युवासेना शहर प्रमुख)
मा. प्रतीक सोळंके(शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख)
भिकाभाऊ गायकवाड, अशोक हिवराळे, मिलिंद हिवराळे, विठ्ठल कांडे, प्रभाकर शिंगोटे, बाळू डोके, साहेबराव पाटील, जितेंद्रभाऊ ,नरहरी लांडे,रामदास चौधरी,राजेंद्र इंगळे, किशोर वाकोडे, विष्णू घनोकार, बाळूभाऊ धोरण, दीपक चव्हाण, सचिन कल्याणकर, जितेंद्र जुनगडे, संजू मेहसरे, महादेव सपकाळ,देवेंद्र जैस्वाल, संभाजी वसे, भिका पाटील,विठ्ठल भाकरे, पुरुषोत्तम कुटे,संदीप पाटील, सचिन पाटील.
सौ. दुर्गाताई गायकवाड माहिला आघाडी तालुकाप्रमुख
सौ. सरिता ताई बावस्कार (महिला आघाडी शहर प्रमुख
सौ. प्रज्ञाताई तांदळे- उपशहर प्रमुख, सौ. भावनाताई सोनटक्के- शहर सचिव,
सौ. मंगलाताई सपकाळ, सौ.रुपाली घोपे - सोशल मीडिया प्रमुख, सौ. वनिता गव्हाळे- सहसचिव, सौ. विजया गोरे, भाग्यश्री तांदळे, व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
إرسال تعليق