Hanuman Sena News

एक हात मदतीचा; रुग्णांची कैवारी आपलीं हनुमान सेना




मलकापूर: मलकापूर येथील हनुमान सेना ही संघटना रुगणसेवा व सामाजिक कार्य करित आहे. आज पावेतो संघटने कडून विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबावत आहे. तसेच २ वर्षाच्या कार्यामध्ये २ ते ३ हजार लोकानां रक्तदान करण्यात आले. याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा अनेक होतकरु व गोरगरीब विदयार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत केली तसेच युवा वर्गांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला त्यात पाणीपुरी, फुलहार ,फळ विक्रेता पाणपट्टी, हॉटेल, बेकरी, पंचर दुकान, इत्यादी रोजगार उपलब्ध करून दिले आहे. हे कार्य असेच अविरत पणे सुरु राहिल. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल भाऊ टप यांनी दिली. तसेच त्यांचे मित्रमंडळींचा सहभाग मोलाचा आहे. त्यात प्रामुख्याने नानाभाऊ येशी, रविभाऊ वानखेडे, संतोष सिंह राजपूत,हेमंत रेढें,अजय बघे, वीरेंद्र कासे , राजकुमार वानखेडे, कुणाल ढोलकर,अनंता दिवनाले, निलेश चोपडे,अजय चोपडे, गणेश रोठे, विशाल राजपूत, आकाश गोरे , मंगेश शिंदे,देवीन टाक, ओम टप, राहुल बघे,प्रशांत काजळे, अमोल पाटील, अमोल मोरे, रोहित कांडेलकर, रवी गायकवाड, ऋषी तेजेकर व असंख्य सहकारी रुग्णसेवा मलकापूर शहरात करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संघटनेद्वारे पुरस्कार व सन्मानही मिळाला आहे तसेच हनुमानाचे मंदिरांच्या जिर्णोद्धाराचे कामही या संघटनेने करत आले आहे यांच्या माध्यमातून दहा ते पंधरा  मंदिरांचा जीर्णोद्धार झालेला आहे तसेच डॉक्टर,शिक्षक , वकील, पोलीस, व्यापारी या वर्गातील व्यक्ती सुद्धा हनुमान सेनेच्या माध्यमातून रक्तदानासाठी नेहमीच अग्रेसर असतात तसेच महिला वर्ग सुद्धा,रक्तदान करण्यासाठी आपले नाव नोंदवून ठेवतात. तसेच दिनांक 22/11/2022 रोजी एका रुग्णाला बी पॉझिटिव्ह रक्त लागणार होते क्षणाचाही विलंब न करता मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील डॉक्टर प्रदीप जयस्वाल यांनी वीस किलोमीटर अंतरावरुण मलकापूरला येऊन बी पॉझिटिव्ह रक्त एका गरजू रुग्णाला दिले अशा या रक्तदात्यास हनुमान सेने तर्फे शाल श्रीफळ देऊन गौरविले हनुमान सेनेच्या कार्याला मानाचा मुजरा असेच त्यांचे कार्य अविरतपणे चालू राहो हीच सदिच्छा.

Post a Comment

أحدث أقدم