Hanuman Sena News

समता संघटनेच्या आंदोलनाला यश ; गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासंनाच्या कारवाईला सरकारने स्थगिती दिली...






विशेष प्रतिनिधी,
मोताळा.

 समता संघटनेच्या आंदोलनास यश आले असून गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासना च्या कारवाईस सरकारने स्थगिती दिली आहे.गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासनाच्या कारवाई विरोधात आझाद मैदानावर मुंबई येथे 26 नोव्हेंबर संविधान दिनापासून समता संघटनेने   आमरण  उपोषण  सुरू केले होते.आंदोलनाची चौथ्या दिवशी दखल घेऊन मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आंदोलनकर्ते समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ गवई, प्रदेशाध्यक्ष आम्रपाल वाघमारे जिल्हाध्यक्ष विजय दोडे यांच्यात सुमारे तासभर चर्चा होऊन यशस्वी तोडगा निघाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही अतिक्रमण धारकावर कारवाई न करण्याचे निर्देश दिलेत व आलेल्या सर्व नोटीस देखील रद्द करण्याच्या सूचना दिल्या.तसेच राज्यातील कोणत्याही अतिक्रमण धारकांना भयभीत होण्याचे कारण नाही असे सुद्धा महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.यावेळी आ. जयकुमार रावल देखील उपस्थित होते.या आंदोलनामुळे  राज्यातील सर्व  गायरान अतिक्रमण धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे .

Post a Comment

أحدث أقدم