Hanuman Sena News

बाबासाहेबांच्या स्मृती वाचनालयास जागा देण्याची मागणी भिमसैनिकांचे मलकापूर शहरात धरणे आंदोलन...


मलकापूर :  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागील जागा वाचनालयासाठी मिळावी या मागणीवरून भीमसैनिक आक्रमक झाले आहेत त्यासाठी शनिवारी मलकापुरात धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनास विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे मलकापूर येथे रेल्वे स्थानकाजवळ पालिका अत्यारीत्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे पालिकेसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पुतळ्याची देखभाल केली जाते गतकाळात पुतळ्याचे सौंदर्यकरण करण्यात आल्याने परिसर खुलला आहे पुतळ्यामागील जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती वाचनालयाला मिळावी या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे त्याबाबत प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागांना निवेदन सादर करण्यात आले आहे मात्र कारवाई होत नसल्याने शनिवारी आंदोलन करण्यात आले आंदोलन कर्त्यांनी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून घोषणाबाजी केली स्टेशन रस्त्यावरून तहसील चौकात धरणे आंदोलन करण्यात आले त्यात सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय सावळे, पॅंथर सेनेचे भिमराजभाई ईंगळे, चंदु झनके,देवानंद तायडे, प्रताप बिराड, रिकी भाई सावळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आंदोलनात द्रोण सोनवणे मंगेश मेढे विलास तायडे सागर तायडे आधी सह सेवा ट्रस्ट व पॅंथर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم