मलकापूर: एसटी बसेस नियमित वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची होत असलेली हेळसांड व विद्यार्थ्यांचा होत असलेले शैक्षणिक नुकसान याकरिता एसटी बसेस नियमित व वेळेवर सुरू करण्यात यावी या मागणी करिता आज जीवन विकास विद्यालय दुधलगाव यांनी मलकापूर एसटी डेपो आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले व सदर प्रश्न तातडीने निकाली लावण्याची मागणी केली विद्यालयात आव्हा व उर्हा येथून इयत्ता 5 ते 10 पर्यंत 55 विद्यार्थी व विद्यार्थिनी शिकण्यासाठी परिवाहन मंडळाच्या बसने दररोज ये-जा करतात. शाळेची वेळ 10:20 ते 4:20 असल्याने दुपारनंतर पिंपळगाव देवी बस ची वेळ 3:15 ऐवजी 4 :15 अशी करावी म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तरी बसच्या वेळेत बदल करून उपकृत करावे असा विनंती अर्ज मुख्याध्यापक जीवन विकास विद्यालय दुधलगाव यांच्यातर्फे आगार व्यवस्थापक रा. प.महामंडळ यांच्याकडे देण्यात आला.
जीवन विकास विद्यालय दुधलगाव यांच्यातर्फे आगार व्यवस्थापकांना निवेदन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق