मोताळा: दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन तथा महिला अर्बन-को-ऑफ- क्रेडिट सोसायटीच्या लाल माती येथील शाखेचा शुभारंभ 7 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.किन्होळा, पान्हेरा, खेडी, कोर्हाळा बाजार, कुर्हा,गोतमारा, हनवतखेड, थळ, तपोवन, पोखरी, आधी दहा गावे या शाखेची संलग्न असणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय उपजिल्हाधिकारी तथा अभियंता कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शेळके हे होते तर अध्यक्षस्थानी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री ताई शेळके या होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मुक्तारसिंग मोरे, पंचायत समितीचे मा. सभापती उत्तमराव वैराळकर, पानेरा ग्रामीणचे संस्थापक अध्यक्ष दशरथ तायडे, यांची विशेष उपस्थिती लाभली. तर सहकारी सूतगिरणी मलकापूरची मा. संचालक एकनाथ पाटील, मोताळा पंचायत समितीचे मा. सभापती कैलास गवई, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, महिला काँग्रेस कमिटीच्या मा.तालुकाध्यक्ष नीनाताई पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य उज्वलाताई मोरे, मा.सभापती कुसुमताई एंडोले, गोतमारा - हनवतखेड सरपंच विनोद राठोड ,रोहिणखेडचे सरपंच डॉ. भानुदास हुंबड कोर्हाळा बाजाराचे सरपंच श्रीकृष्ण सोनवणे, खेडीच्या सरपंच ज्योतीताई मोरे, पान्हेराच्या सरपंच किरण ताई काटकर, तपोवन- पोखरी काळेगावच्या सरपंच लक्ष्मीबाई पाटील कर्हाच्या सरपंच वर्षाताई घोती, किन्होळा सरपंच पद्माबाई गवई ,खेडीचे मा. सरपंच दरबार सिंग मोरे, सुनील पाटील, प्रकाश राठोड, शिवदास महाराज राहणे, राजेंद्र जंगले, सुभाष वैराळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन; दिशा बचत गट फेडरेशनच्या लाल माती शाखेचा शुभारंभ...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق