Hanuman Sena News

कार चालवणे पडले महागात महिलेसह मुलीचा मृत्यू...


देऊळगाव राजा (बुलढाणा) - कार चालविणे शिकत असताना ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबले़ त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला तुडुंब भरलेल्या विहिरीत कार कोसळली. यामध्ये कार शिकत असलेल्या महिलेबरोबरच मुलीचा मृत्यू झाला़, तर पतीने कारमधून उडी घेतल्याने ते सुदैवाने बचावले़ ही घटना ३ नोव्हेंबरला दुपारी देऊळगाव राजा येथे घडली़ स्वाती अमोल मुरकुट (वय ४०), तर सिद्धी अमोल मुरकुट (१०) असे मृतकांची नावे आहेत.सध्या दिवाळीची सुट्टी असल्यामुळे डोरव्ही तालुका सिंदखेड राजा येथील अमोल दिनकर मुरकुट जाफराबाद पंचायत समिती अंतर्गत शिक्षक पदावर कार्यरत आहेत़ सुट्ट्या सुरू असल्याने ते पत्नीला कार चालविणे शिकवीत होते़ कच्या रस्त्याने ते कार चालविणे शिकवीत असताना देऊळगावराजाकडून चिखलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत असताना ब्रेक लावण्याऐवजी त्यांच्या पत्नी स्वाती मुरकुट यांच्याकडून ॲक्सिलेटर दाबला गेला.कारवरील नियंत्रण सुटून कार तुडुंब भरलेल्या ८० फूट खोल विहिरीत कोसळली. यामध्ये स्वामी मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा बुडाल्याने मृत्यू झाला, तर अमोल मुरकुट हे कसेबसे कारच्या दरवाजातून बाहेर पडले़ घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांचा मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली़ तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे बंबांनाही पाचारण करण्यात आले़ आहे

Post a Comment

أحدث أقدم