ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत आपली वर्णी कशी लागेल यासाठी भेटी-गाठी संपर्क वाढविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांची चढाओढ आतापासून बघायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच जनतेमधून निवडून येणार व सदस्य प्रभागांमधून निवडणूक लढविणार आहेत त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सध्या चुरस कमी झाली आहे प्रभागांमध्ये सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता प्रभागातील लोक निरुत्साही असल्यामुळे सरपंच पदाच्या उमेदवाराला मनधरणी करून सदस्य शोधावे लागत आहेत प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीच्या गावामध्ये सरपंच पदाची निवडणूक लढविण्याकरिता व आपले पॅनल उभे करण्याकरिता स्पर्धा सुरू आहे. यामधील बरेच लोक पूर्वीपासून ग्रामपंचायत लढवित असल्यामुळे व सरपंच पद भूषविणाऱ्यांची संख्याच अधिक आहे गावांमधील सामान्य मतदार मात्र नवीन चेहऱ्यांच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.योग्य व गावाच्या विकासाची कामे करणाऱ्या उमेदवाराच्या शोधात असलेले मतदार प्रस्थापितांकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत. अनेक सरपंच पदाची उमेदवारांना आपल्या पॅनल सोबत प्रभागांमध्ये उभी करण्याकरिता सदस्य मिळायला तयार नाही. भावी गाव कारभाऱ्यांची जणू काही परीक्षा सुरू आहे उमेदवार उभे करण्याकरिता तयारी झाली त्यांच्या निवडणुकीचा सर्व खर्च तसेच अर्ज भरणे कागदपत्र तयार करणे हा खर्च सुद्धा कोणी करायला तयार नसल्याचे दिसून येते.ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक लढण्याकरिता नागरिकांमध्ये निरुत्साह दिसत आहे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असल्यामुळे परिसरातील ग्रामपंचायतीचे राजकीय वातावरण थंडीतही तापले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाढली चढाओढ...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق