Hanuman Sena News

रेफर केलेल्या महिलेच्या पोटातील कळा कशा थांबतील? ...



 जिल्ह्यात सप्टेंबर अखेर 5702 महिलांची प्रसूती



बुलढाणा: गर्भवतीच्या प्राथमिक चाचण्या आणि उपचार ग्रामीण भागात होत असले तरी ऐनवेळी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जात असल्याचे चित्र दिसून येते. ऐन वेळेवर खेळला जाणारा रेफरचा हा खेळ गर्भवतींच्या जीवावर बेतु शकतो. या परिस्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने रेफर केलेल्या महिलांच्या पोटातील काळा थांबतील तरी कशा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे अगदी जोखमीच्या प्रसूती ही यशस्वीपणे केल्या जात असल्याने सरकारी रुग्णालयाकडे कल वाढला आहे .रक्तदाब वाढून झटके येणारी ,प्रसुती पश्चात अतिरक्तस्त्राव ,बाळाची वार सुटणे, रक्त गोठण्याची प्रक्रिया, खराब झालेले रक्त व पांढऱ्या पेशींची संख्या कमी असणे, किडनी व लिव्हर फंक्शनमध्ये समस्या उद्भवलेल्या गरोदर महिला ,रुग्ण अति जोखमीच्या गटातील असतात त्यांच्यावरील उपचार व प्रसुती करणे हे आव्हानात्मक काम असते, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर राहत नसल्याने गर्भवती महिलांना रेफर केले जाते. काही प्राथमिक आरोग्य केंद्राची यामध्ये चांगली कामगिरी असली तरी काहींची स्थिती फारच गंभीर आहे काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधाही नसल्याचे चित्र आहे. सर्व सुविधा असूनही रुग्णालयातून रेफरचे प्रमाण जास्त असल्याचे चित्र आहे. याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देणार का  ! हाच एक प्रश्न पडलेला आहे.

Post a Comment

أحدث أقدم