Hanuman Sena News

सुषमा अंधारे चे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांचा शिंदे गटात प्रवेश...






शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या पोकळीत संधीचं सोनं करत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या नेत्या म्हणून कमी कालावधीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना उभं केलंय. वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर वैजनाथ वाघमारेंना विभक्त पत्नी सुषमा अंधारेंविरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याची वेळ आली तर लढणार का? या प्रश्नावर वैजनाथ वाघमारे म्हणाले, “तशी वेळ आली तर अगदी निवडणूक लढेन. माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे माझा नेता, माझा पक्ष जो निर्णय देतील, जे काम करायला सांगतील ते करेन. एकनाथ शिंदेंची भूमिका चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करण्याची आहे. ते सांगतील तसं मी काम करेन. माझ्यासमोर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही, मी निवडणूक लढेन.”सुषमा अंधारे आणि तुम्ही वेगळे का झालात? विभक्त पती वैजनाथ वाघमारे म्हणाले, “कारण त्यांनी“सुषमा अंधारे इतिहासाचे दाखले देते हे तुम्हाला कोणी सांगितलं?” इतिहासाचे दाखले द्यायला तिला पुस्तक कोणी दिलं असा सवालही वाघमारेंनी अंधारींना विचारला त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या त्यानंतर आमच्या नात्याला तडा गेला सुषमा अंधारे पासून वेगळे का झाले याचाही कारण सांगितले ते म्हणाले सूक्ष्म अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असं मला वाटत होतं त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या त्यानंतर आमच्या नात्याला खरा तळा गेला त्यांचे विचार वेगळे राहिले आणि माझे विचार वेगळे राहिले तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही सुषमा अंधारे आंबेडकर चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या मला त्यांना नेताच करायचं होतं मला त्यांना झोपडपट्टीत पाठवायचं नव्हतं किंवा ऊसतोड कामगार वीट भट्टी कामगार म्हणून पाठवायचं नव्हतं पण चकली देणे आणि हलकी ढोलकीचा तमाशा उभा करणे योग्य वाटला नाही तो त्याचा निर्णय होता आणि ते मला मान्य नव्हता त्यामुळे तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही अशी माहिती वैजनाथ वाघमारे यांनी दिली सुषमा अंधारे तोफ वगैरे काही नाही असं व्यक्त केलं तसेच त्या ठाकरे गटात गेल्या हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असेही ते म्हणाले.

Post a Comment

أحدث أقدم