Hanuman Sena News

थेट सरपंचपदासह 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी 18 डिसेंबरला मतदान...




राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल.विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपुर,59 ,धुळे-128, गडचिरोली-27 ,गोंदिया-348, हिंगोली-62 ,जळगाव-140, जालना-266, कोल्हापूर-475, लातूर-351, नागपूर-327, नंदुरबार-123, उस्मानाबाद-166, पालघर-63, परभणी-128 ,पुणे-221, रायगड-240 ,रत्नागिरी-222, सांगली-452 ,सातारा-319, सिंधुदुर्ग-325, सोलापूर-189, ठाणे-42 ,वर्धा-113, वाशिम-287 ,यवतमाळ-100, नांदेड-181 ,नाशिक-196, एकूण- 7751

Post a Comment

أحدث أقدم