Hanuman Sena News

सात जागांसाठी पोट निवडणूक निकाल; भाजपाचा 4 जागांवर विजय उद्धव गट 1,टी आर एस 1, राजद,1...




देशातील सहा राज्यांमध्ये पार पडलेल्या ७ विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपने ४, तर तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस), राजद आणि शिवसेना (उद्धव गट) यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. यापैकी काँग्रेसच्या दोन जागा भाजप आणि टीआरएसने खेचून घेतल्या आहेत, तर उर्वरित पाच जागांवर पूर्वीच्याच पक्षांनी विजय मिळवले आहेत.चार आमदारांचे निधन, दोन आमदारांचे राजीनामे आणि एक सदस्य अपात्र ठरल्याने या जागांवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक झाली होती. एकूण ७ जागांपैकी सहा जागांवर पूर्वीच्याच आमदाराची पत्नी अथवा मुलाने विजय मिळवला आहे. हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघात काँग्रेस आणि आमदारकी दोन्हींचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुलदीप बिश्नोई यांचे पुत्र भव्य निवडणुकींच्या रिंगणात होते. त्यांनी काँग्रेसची ही जागा जिंकली. परंतु तेलंगणमध्ये मुनुगोडे मतदारसंघात आमदार राजगोपाल रेड्डी यांचा राजकीय डाव त्यांच्यावरच उलटला. काँग्रेस सोडून त्यांनी भाजपकडून पोटनिवडणूक लढवली, मात्र जनतेने त्यांना नाकारले आणि टीआरएसचे केपीरेड्डी यांच्या गळ्यात िवजयाची माळ घातली. बिहारमध्ये मोकामा मतदारसंघात अपात्र आमदार अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनी विजय मिळवला. अनंतसिंह यांनी एके-४७ मशीनगन बाळगल्याबद्दल त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. महाराष्ट्रात अंधेरी पूर्व मतदारसंघात दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके, उत्तर प्रदेशात गोला गोकरणनाथचे दिवंगत आमदार अरविंद गिरी यांचे पुत्र अमन गिरी, गोपालगंज (बिहार) मध्ये दिवंगत सुभाष सिंह यांची पत्नी कुसुमदेवी आणि धामनगर (अोडिशा) येथील दिवंगत आमदार विष्णू चरण सेठी यांचे पुत्र सूयर्वंशी सुराज हे विजयी झाले.पोटनिवडणूक विजयी पक्ष आधीचा पक्ष गोला गोकरणनाथ भाजप भाजप मोकामा राजद राजद गोपालगंज भाजप भाजप आदमपूर भाजप काँग्रेस मनुगोडे टीआरएस काँग्रेस धामनगर भाजप भाजप अंधेरी पूर्व शिवसेना शिवसेना टीआरएस बळकट तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी त्यांच्या तेलंगण राष्ट्र समितीचे राष्ट्रीय पक्षात रूपांतर केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्यात विजयी झाल्याने पक्षाचे बळ वाढले आहे.

Post a Comment

أحدث أقدم