Hanuman Sena News

राष्ट्रवादी'चे 12 आमदार फुटले फक्त मुहूर्त ठरायचाय:सोलापूरचा मोठा नेता फुटून विरोधकांना दणका बसणार, शहाजी पाटलांचा दावा...


राष्ट्रवादीचे बारा नेते फुटले आहेत, फक्त मुहुर्त ठरायचा आहे. सोलापूरमधील मोठा नेता फुटणार आणि विरोधकांना मोठा दणका बसणार आहे. फक्त थोडं थांबा वाट पहा असा इशारा काय झाडी, काय डोंगार या वाक्याने प्रचंड प्रसिद्धी झोतात आलेले आमदार शहाजी पाटील यांनी आज दिला.आमदार सरकारमागे शहाजी पाटील म्हणाले, 170 आमदार मजबूतपणाने शिंदे फडणवीस सरकारच्या मागे उभे आहेत. सर्व आमदार आपल्या मतदार संघात काम चांगले करीत आहेत. त्यांना निधी मिळत आहे, जनतेची कामे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे 12 नेते फुटले आहे पण मुहुर्त अजून ठरला नाही तो लवकरच ठरेल.थोडं थांबा मग बघा शहाजी पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यात मोठा नेता लवकरच फुटेल, तो विरोधकांना मोठा दणका बसणार आहे. थोड थांबा पुढे पाहा काय होते ते बघा ठरलेले आहे.राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात सामंत म्हणाले, एखादा पक्ष जेव्हा सत्तेत नसतो, तेव्हा कार्यकर्त्यांना माॅरल सपोर्ट देणे गरजेचे असते. अन्यथा कार्यकर्तेच सोडा आमदारही सैरभैर होतात. अनेक आमदार हे शिंदे फडणवीसांच्या संपर्कात असल्याने आमदार सैरभैर होऊ नये म्हणून त्यांना आपली सत्ता लवककरच येईल, विद्यमान सरकार पडेल असे सांगावे लागते.सामंत म्हणाले, राष्ट्रवादी काॅंग्रेससाठी सत्ता हे दिवास्वप्न ठरणार आहे. त्यांचे 2025 हे वर्षही सत्तेसाठी दिवा स्पप्न ठरणार आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दर पाच वर्षांनी सत्ता येईल आणि आमचेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंढरपुरच्या विठ्ठलांची पूजा करणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم