Hanuman Sena News

ST संप:ऐन दिवाळीत राज्यात ST संपाचे वारे; पगार रखडल्याने कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत, सरकारकडे लक्ष...


ऐन दिवाळीत पुन्हा एकदा एसटी कर्मचारी संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत. प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार रखडल्याने या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे समजते.गेल्या वर्षी पुकारलेल्या संपाने उभ्या महाराष्ट्राच्या जनतेचे हाल झाले, यंदा तसे होऊ नये म्हणून नवे सरकार तरी प्रयत्न करणार का, हे पाहावे लागेल.रखडलेले पगार आणि एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे उभ्या महाराष्ट्राचा गावगाडा थांबला. गेल्या वर्षी कसातरी हा संप मिटला. मात्र, त्यातल्या अनेक मागण्यात अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. शिवाय एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार 10 तारखेनंतरही झाला नाही. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाल्याचे समजते.राज्य सरकराने औद्योगिक न्यायालयाचे उल्लंघन केल्याचा आरोप होतोय. सरकारने उच्च न्यायालयाला दिलेली हमीही पाळली नसल्याचे सांगण्यात येतेय. चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांचा पीएफ, विमा, घराचे हफ्ते थकले आहे. यासह इतर मागण्या पुढे करत एसटी कर्मचारी संपाच्या तयारीत असल्याचे समजते.एसटी सेवेतून आवश्यक ते उत्पन्न मिळत नाही. त्यात गेल्यावर्षी संप पुकारल्याने अनेक गाड्या महिनोनमहिने थांबल्या. त्यामुळे त्यांच्यात बिघाड झाला. कामे निघाली. त्यातच प्रवासी संख्या घटली. या साऱ्यांमुळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे सरकारच्या निधीवरच मंडळाचा कारभार सुरू आहे. त्यात आता सरकारने या निधीला कात्री लावली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत.गेल्या वर्षी भाजपाने एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला होता आता भाजपा सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 118 एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीची कारवाई शिंदे फडणवीस सरकारने मागे घेतली आहे. आता हे सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारांचा प्रश्न मार्गी लावणार का असा प्रश्न विचारला जात आहे

Post a Comment

أحدث أقدم