बुलढाणा: सुमारे तीन वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना एसटीमध्ये नियुक्त मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही प्रमाणात उमेदवारांना 4 ऑक्टोबरला नियुक्तीपत्र मिळणार आहे. नागपूर, भंडारासह काही उमेदवारांचा यात समावेश आहे. त्यानंतर इतरांनाही नियुक्ती देण्यात येईल. अखेर नियुक्ती मिळत असल्याने उमेदवार आशावादी झाले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ ( एसटी ) ने 2019 मध्ये चालक व वाहक कनिष्ठ या पदासाठी सरळ सेवा भरती घेतली होती. लेखी परीक्षा वाहनचालक चाचणी कागदपत्राची पडताळणी, वैद्यकीय तपासणी सेवापूर्व प्रशिक्षण, असे पदभरतीचे सर्व टप्पे पार करत राज्यातील 2800 उमेदवार सेवेसाठी पात्र ठरले आहे. मात्र जवळजवळ तीन वर्षे होऊनही नियुक्ती मिळाली नव्हती. नियुक्तीसाठी उमेदवारांनी उपोषण केले ,निवेदने दिली, उमेदवारांनी आपल्या वेदना मांडल्या होत्या, त्याची अखेर प्रशासनाने दखल घेतल्याने त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता उमेदवार आशावादी झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील प्रशिक्षण झालेले 138 उमेदवार व ज्यांचे प्रशिक्षण बाकी आहे असे 263 विद्यार्थी असे एकूण 401 विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे
सामाजिक कार्यकर्ते ललित भाऊ बाठे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق