Hanuman Sena News

अकोल्यात शिवसेना उपशहर प्रमुखाची हत्या...



अकोला: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरातील जठारपेठ भागात रविवारी रात्री घडली. त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.शहरातील जठारपेठ भागात कपले यांच्यावर दोन अज्ञात लोकांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ विशाल कपले यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाया घटनेनंतर खाजगी रुग्णालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली विशाल कपडे यांच्या हस्तेमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही हल्लेखोर प्रसार झाले आहेत या घटनेचा तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके करीत आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم