मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीला आता नवे वळण मिळाले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्याचे संकेत दिले आहे. 'यापूर्वी अनेकदा योग्य पद्धतीने मागणी झाल्यावर असे निर्णय घेतले आहे, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल' असं फडणवीस म्हणाले.राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या उमेदवाराला समर्थन मिळावे म्हणून आशिष शेलार राज ठाकरे यांना भेटायला गेले होते. त्यावेळेस त्यांनी इच्छा आणि मत वक्त केली आणि आता तसे पत्र ही दिले आहे. यापूर्वी अनेकदा योग्य पद्धतीने मागणी झाल्यावर असे निर्णय घेतले आहे. आर आर पाटील असो किंवा काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका असो. पण आता आम्ही उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता या पत्रावर विचार ही करायचा झाला तर मला तो एकटा करता येणार नाही. माझ्या पक्षात मी काही एकटा निर्णय घेत नाही' असं फडणवीस म्हणाले.'बाळासाहेबांची शिवसेना पण आमच्या सोबत आहे. त्यामुळे मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल' असं फडणवीस म्हणाले.राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. जर तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराचं नाव घेत असेल तर भाजपच्या उमेदवाराने भरलेला अर्ज मागे घ्यावा. भाजपसाठी जी लाचारी पत्कारली आहे, ती नाकारावी आणि पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध करण्याचा पायंडा पाळावा, असं आवाहन राऊत यांनी केलं.तर, ;एखाद्या नेत्याचं निधन झालं तर पोटनिवडणूक ही बिनविरोध होत असते. विरोधीपक्ष सुद्धा आपला उमेदवार कधी उभा करत नाही पण या ठिकाणी आपलं दुर्दैव आहे की विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला आहे निवडणूक लढवावी असं त्यांच्या उमेदवाराला वाटत आहे माझी इच्छा आहे मला असं वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोधच होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिली अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक बिनविरोध करण्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी आवाहन केलं आहे ऋतुजा लटके यांच्या आव्हानाला आता विरोधी पक्ष विशेषता भाजप कसा प्रतिसाद देतोय हे आता पहाव लागेल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून मोठं राजकीय खेडी व घडामोडी सुरू असल्याची माहिती मिळत आहे रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचा आमदार होण्याने कै. रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की ,भारतीय जनता पक्षाने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं अशी विनंती राज ठाकरे यांनी फडणवीस यांना केले
अंधेरी पोटनिवडणुकीत आता नवे वळण मिळाले आहे; राज ठाकरे यांच्या पत्रानंतर फडणवीसांचे संकेत...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق