नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन रूढी परंपरांच्या वणव्यात पोळून निघालेल्या समाजाला मानवी मूल्ये दिली. याच दीक्षाभूमीवर अस्पृश्यांच्या जीवनात निळी पहाट उगवली तो दिवस अशोक विजयादशमीचा. या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच थायलंड, जपान, हॉंगकॉंग, तायवान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका येथून धम्मगुरुंचे आगमन यावर्षी झाले आहे. दीक्षाभूमीपासून तर शांतीवन आणि ड्रॅगन पॅलेस परिसरातही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.बौद्ध बांधवांचे थवे हातात निळे झेंडे घेऊन दीक्षाभूमीवर येत आहेत. अनेक ठिकाणी बुद्ध आणि भीमगीतांच्या मैफिली सजल्या आहेत. सभोवतालच्या सर्व रस्त्यांवर भीमसैनिकांची गर्दी दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर अनुयायांनी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी रांग लावण्यास सुरुवात केली होती.आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात लावण्यात येणाऱ्या विविध स्टॉल्समध्ये पुस्तकांचा खजिना पुस्तकप्रेमींसाठी उपलब्ध आहे.
दरवर्षी दीक्षाभूमी परिसर व परिसराबाहेर सुमारे साडेसातशे स्टॉल्स लावण्यात येतात. बाहेर रस्त्यावर 500 आणि दीक्षाभूमी पटांगणात यावर्षी अडीचशे तीनशे स्टॉल पुस्तकांचे आहेत हे विशेष जगभरातून येणाऱ्या बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमी परिसरात विविध सामाजिक संघटनांनी अन्नदानाची व्यवस्था केली आहे यासोबतच नी शुल्क आरोग्य तपासणी शिबिर,फळ, वाटप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दीक्षाभूमीवर दरवर्षी होणाऱ्या गर्दीमुळे वर्धा महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडूनही पार्किंग साठी मेट्रो स्टेशन परिसर आणि आता नव्याने तयार झालेल्या सिमेंट रोडच्या बाजूच्या जागेवर वापर करण्यात येत आहे त्यामुळे वर्धा महामार्गावरील वाहतूक कोळंबीली नाही हे विशेष
إرسال تعليق