खामगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अपहरणाच्या घटना वाढल्यात अर्थात या घटना काही खऱ्या खोऱ्या अपहरणाच्या नसतात सगळं कळत असलेल्या मुली केवळ अठरा वर्षे पूर्ण नसल्याने कायदेशीर दृष्ट्या संज्ञान नसतात .त्यामुळे सगळ खरं माहित असलं तरी पोलिसांनाही अशा प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करावा लागतो. खामगाव येथील प्रकरण तुमच्या लक्षात येईलच त्याचं झालं असं की, खामगाव येथील जीएस कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकत असलेल्या मुलीचे वय अजून अठरा वर्षे पूर्ण नाही ती काल 11 ऑक्टोबरला सकाळी कॉलेजला गेली मात्र नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यावर ती काही घरी परतली नाही. मुलीच्या वडिलांनी मैत्रिणीकडे चौकशी केली असता दुपारी दोन पर्यंत ती कॉलेजमध्ये होती मात्र त्यानंतर ती दिसली नसल्याचे सांगण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांनी सगळीकडे शोध घेऊनही मुलगी सापडली नाही दरम्यान मुलीच्या वडिलांनी स्वतःचा मोबाईल तपासला असता त्यावरील फोन पे मधून एका व्यक्तीला दोनदा पाच हजार रुपये असे दहा हजार रुपये पाठवल्याचे समोर आले सदर क्रमांकावर मुलीच्या वडिलांनी फोन लावून पाहिले असता ते पैसे खामगाव तालुक्यातील जयपुर लांडे येथील सानु तिहिले याला देण्यात आल्याचे समोर आले तुमच्या मुलीनेच ते पैसे सानू तिहिले या तरुणाला द्यायचे सांगितले होते असे समोरील व्यक्तीने सांगितले. मुलीच्या वडिलांनी त्याच्याकडून सानू तिहिले याचा नंबर घेऊन त्याला फोन लावून पाहिला मात्र त्याचा मोबाईल सातत्याने बंद येत आहे त्यामुळे सानू तिहिले यानेच आपल्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याची तक्रारीत म्हटले आहे. तक्रारी वरून पोलिसांनी सानू तिहिले या तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास खामगाव पोलीस करीत आहे
बापाच्या फोनपे वरून आधी प्रियकरायला पैसे पाठवले ! नंतर त्याच्यासोबत गेली पडून...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق