Hanuman Sena News

आयबीच्या रिपोर्ट नुसार गुजरात मध्ये ' आप 'आपले सरकार स्थापन करणार... अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली: सध्या आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे भाजप आपली सत्ता कायम राहणार, असा दावा करत आहे. तर, दुसरीकडे आम आदमी पक्षाचे सरकार येणार, असे दावे आप नेत्यांकडून केले जात आहेत. यातच आता आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयबीच्या(IB) रिपोर्टचा हवाला देत गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होत असल्याचा दावा केला आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला. ते म्हणाले की, 'गुजरातच्या जनतेचे मी आभार मानतो. आयबीच्या रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये थोड्या फरकाने आपचे राज्य येणार आहे. ही रिपोर्ट पाहून भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे आता आम्हाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेससोबत मागच्या दाराने चर्चा सुरू केली आहे,' असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.आयबीचा रिपोर्टमध्ये आम आदमी पक्षाचा विजय थोड्या फरकाने असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र देश आणि राज्याच्या हितासाठी हा विजय अधिक मोठा करा असे आव्हान केजरीवालांनी गुजरातच्या जनतेला केले आहे. आयबीचा हा अहवाल पाहिल्यानंतर भाजपामध्ये खळबळ उडाली आहे असा दावाही केजरीवाल यांनी माध्यमांसमोर केला भाजप विरोधी मते वाढवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे यासाठी काँग्रेसही भाजपाला आतून मदत करत आहे .आमची मते कमी करण्यासाठी भाजप काँग्रेस एकत्र आले आहे. असा दावाही त्यांनी यावेळी केला गुजरात मध्ये सरकार बनताच तेथील गाईंसाठी विशेष भत्ता दिला जाईल असे सांगितले हा भत्ता प्रतिदिन एक गाय चाळीस रुपये असेल असे त्यांनी सांगितले गुजरातच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले भाजपाचे लोक गोंधळ घालण्यासाठी सर्व युक्त्या अवलंबत असतात असे ते म्हणाले या पत्रकार परिषदेला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ही उपस्थित होते .हे दोन्ही नेते सध्या दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

Post a Comment

أحدث أقدم