मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेले बंड आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. या मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ज्याप्रमाणे मुघलांना संताजी-धनाजी दिसायचे, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना जिकडे तिकडे शिंदे फडवणीस दिसताहेत. त्यांचा उद्धव ठाकरे यांनी धसका घेतला आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली आहे. त्यांच्याकडे वाजवायला नवी कॅसेट नाही. म्हणून ते नुसते शिंदे शिंदे करत असतात. आता तर ते संताजी धनाजी जसे मुघलांना दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना शिंदे- फडणवीस दिसू लागले आहेत.कुठेही गेले तरी त्यांना शिंदे फडणवीस दिसतात. खिडकीस बघतात तेव्हा शिंदे-फडणवीस दिसतात. जेवायला बसले तरी शिंदे-फडणवीस दिसतात. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तरी बोलताना शिंदे-फडणवीस दिसतात. एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी मुघलांनी ज्याप्रमाणे संताजी धनाजीचा धसका घेतला होता. त्याप्रमाणे शिंदे फडणवीस यांचा धसका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.दरम्यान अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरेची शिवसेना आणि भाजपा शिंदे गट हे आमने सामने आलेले आहेत या निवडणुकीवरून आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे च्या शिवसेनेकडून शिंदे फडवणीस सरकारवर भोचरी टीका केली जात आहे.
"मुघलांना संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना शिंदे फडणवीस दिसतात" -चंद्रशेखर बावनकुळे
Hanuman Sena News
0
إرسال تعليق