Hanuman Sena News

धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कसं मिळालं? धनुष्यबाण या चिन्हाचा इतिहास काय ?...


मुंबई : शिवसेना पक्ष कुणाचा? शिवसेनेचा नेता कोण? याचा निर्णय कोर्टात प्रलंबित आहे. पण, त्याआधीच निवडणूक आय़ोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह शिवसेना हा पक्ष गेली 33 वर्षे वापरत होता. पण चिन्हच गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतल्यानं उद्धव ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना पुढील निवडणूक धनुष्यबाण या चिन्हाविनाच लढावी लागणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कसं मिळालं? धनुष्यबाण या चिन्हाचा इतिहास काय आहे. यामागची इटरेस्टींग स्टोरी.शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली.1967 साली शिवसेनेनं ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली.1968 साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेचीही निवडणूक लढवली.त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं ढाल-तलवार.1980 च्या दशकात शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळालं होतं.
त्यावेळी मनोहर जोशी, सुभाष देसाई यांच्यासारख्या नेत्यांनी रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवली होती.1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हं मिळाली होती.
छगन भुजबळ यांनी त्यावेळी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली होती.शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह 1989 साली मिळालं.1989 साली निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना चिन्हासाठी नोंदणी करण्याची सूचना केली होती. मनोहर जोशी, सुभाष देसाई आणि विजय नाडकर्णी यांनी दिल्लीत जाऊन नोंदणीची प्रक्रिया पार पाडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिलं.1989 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 4 खासदार निवडून आले. निवडणूक आयोगाच्या निकषांपेक्षा शिवसेनेच्या मतांची टक्केवारी जास्त होती. त्यामुळं धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेकडं कायम राहिलं.1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता आलं. गेल्या 50 ते 60 वर्षाचा राजकीय इतिहासात चिन्हावरून वाद झाल्याचे हे काही पहिलाच प्रकरण नाही कित्येक पक्षात असे वाद झाले आहेत हे वाद निवडणूक आयोगाच्याही दारातही गेले आहेत बहुतांश केस मध्ये निवडणूक आयोगाने पक्षाचा मूड चिन्ह गोठवलेला आहे या चिन्हावर दावा करणाऱ्या दोन्ही गटाला स्वतंत्र चिन्ह दिले आहे सत्तर च्या दशकात काँग्रेसमध्ये इंदिरा काँग्रेस आणि दुसरा सिंडिकेट काँग्रेस अशी फूट पडली होती तेव्हा काँग्रेसच मूड चिन्ह नांगर झुंपलेली बैल जोडी होता त्यावेळी निवडणूक आयोगाने मूळ बैल जोडी चिन्ह कुठून इंदिरा गांधीच्या काँग्रेसला गाय वासरू चे चिन्ह दिलं होतं पुढे आणीबाणी मुळे पुन्हा काँग्रेस फुटली गाय वासरूच्या चिन्हावरून वाद झाला तेव्हा सुद्धा निवडणूक आयोगाने गाय वासरू हे चिन्ह गोठवलं आणि इंदिरा गांधींना काँग्रेसचा आत्ताच म्हणजे हाताचा पंजाच चिन्ह निवडला बिहारमध्ये रामविलास पासवर्ड यांच्या लोक जनशक्ती पार्टीत पासवान चा मुलगा आणि बंडखोर गट अशी फूट पडली होती लोक जनशक्ती पार्टीचे मूड चिन्ह झोपडी होतं निवडणूक आयोगाने झोपेत चिन्ह गोठवला आणि पासवानच्या मुलाला हेलिकॉप्टर तर बंडखोर गटाला शिवण यंत्रणाचे चिन्ह दिल शिवसेनेचे चिन्ह आता निवडणूक आयोगाने गोठवला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात वेगवेगळ्या चिन्ह मिळणार आहे ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्ह बाबत तीन पर्याय देण्यात आले आहेत त्रिशूल मशाल आणि उगवत्या सूर्याचा चिन्हाचा पर्याय पाठवण्यात आले आहे.शिवसेनेच्या चिन्हा बरोबर फक्त शिवसेना असे नावही दोन्ही गटांना वापरता येणार नाही शिवसेना नावासोबत आणखी एक शब्द जोडावा लागणार आहे उद्धव ठाकरेंनी त्यासाठी तीन नाव निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नाव पाठवण्यात आली आहेत अंधेरी पोट निवडणूक तोंडावर आहे ही निवडणूक उद्धव ठाकरेंना धनुष्य बाणा व्यतिरिक्त वेगळ्याच चिन्हावर लढवावी लागणार आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका होणार आहेत या निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढाव्या लागण्याची शक्यता आहे 1989 ते 2022 पर्यंत धनुष्यबाण हीच शिवसेनेची ओळख होती मात्र शिंदेच्या बंडा नंतर ती ओळख तात्पुरती का होईना पुसली गेली आहे उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसैनिकांसाठी हा कसोटीचा काळ आहे

Post a Comment

أحدث أقدم