खामगाव: संपूर्ण देशात एकमेव खामगाव शहरात भक्ती भावाने साजरा केल्या जाणाऱ्या शांती महोत्सवाची गुरुवारी सांगतात झाली गुरुवारी दुपारी एक वाजता मिरवणुकीला जलालपुरा येथून प्रारंभ झाला मिरवणुकी द्वारे हजारो भाविकांनी मोठी देवीला श्रद्धेचा निरोप दिला विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली खामगाव शहरात यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरुवात झाली शहरातील जगदंबा रोड भागात सार्वजनिक मोठी देवी जगदंबा नवरात्रोत्सव मंडळासमोर विविध मंडळांनी मोठे देवीची प्राणप्रतिष्ठा केली. दरम्यान दहा दिवसाच्या पूजाअर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांती उत्सव साजरा करण्यात आला मंगळवारी मोठ्या देवी जवळ होम हवन करण्यात आले त्यानंतर गुरुवारी शांती महोत्सवाची सांगता झाली दुपारी एक वाजता जलालपुरा भागातून मोठ्या देवीची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली जगदंबा रोड, मेन रोड ,गांधी चौक, अकोला बाजार ,जनता बँक, परत जगदंबा रोड, भुसावळ चौक ,मोठा पूल या मार्गे दुपारी अडीच वाजता ही मिरवणूक सतीफैलात पोहोचली या ठिकाणी मोठ्या देवीची सामुहिक आरती करण्यात आली दुपारी सव्वातीन वाजता मोठ्या देवीच्या मरूनिकेला पुन्हा सुरुवात झाली ठक्कर ऑइल मिल ,शिवाजीनगर ,मोठा पूल ,सरकी लाईन ,मेन रोड ,फरशी , सराफा पोस्ट ऑफिस ,राणा गेट जवळ सत्यनारायण मंदिर, घाटपुरी नाका, छोटी देवी मंदिर ,जगदंबा संस्थान मार्गे घाटपुरी नदीच्या पूलापर्यंत पोहोचून तेथून बायपास मार्गे उशिरा रात्री जरूरतलाव येथे देवीचे विसर्जन करण्यात आलेग्रामदैवत असलेल्या आई जगदंबेला मोठी देवी श्रद्धेचा निरोप देण्यासाठी खामगाव आणि परिसरातील भाविकांची मोठी गर्दी जमली होती यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी चहा नाश्ता आणि फराळाचे वितरण करण्यात आले
आई जगदंबेला भाविकांचा श्रद्धेचा निरोप!
Hanuman Sena News
0
إرسال تعليق