शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अजूनही भाजपच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचे समजते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या आडून एक दगडात अनेक पक्षी मारण्याची खेळी सुरूय.यंदा मुंबईत दोन दसरा मेळावे होणार आहेत. यातला एक मेळावा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर घेणार आहेत, तर दुसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर घेणार आहेत. या मेळाव्यात कोण काय बोलणार, याकडेही लक्ष लागले आहे.शिवसेनेचा दसरा मेळावा आणि भाजप ते जुने नाते आहे. बाळासाहेबांनी शिवतीर्थावर घेतलेल्या दसरा मेळाव्याची भाषणे अजूनही शिवसैनिकांच्या स्मरणात असतील. त्यांनी राजकीय नेत्यांची घेतलेली फिरकी असो, की कोणावर केलेला थेट हल्लाबोल. विशेष म्हणजे या मेळाव्यांना भाजपचे नेतेही उपस्थित रहायचे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या दिग्गजांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावाला हजेरी लावलीय. मात्र, कालांतराने दोन्ही पक्षात मतभेदांची दरी निर्माण झाली आणि कालांतराने ती टोकाची ताणली गेली.शिवसेना - भाजप युतीचा काडीमोड झाला. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बस्तान बांधले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंड केले. शिवाय खरी शिवसेना आपलीच, असा दावा केला. पक्ष चिन्हापासून ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंत सारे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न चालवला. त्यातूनच वेगळ्या दसरा मेळाव्याची चूल मांडली. मात्र, या मेळाव्याच्या व्यासपीठापासून तूर्तास भाजप दूरच आहे. भाजपच्या एकाही नेत्याला अजून तरी शिंदेंच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण मिळाले नसल्याचे समजते.शिंदे सेनेच्या प्रत्येक अडीअडचणीच्या काळात भाजप मदतीला धावल्याचे आपण साऱ्यांनी पाहिले. मात्र, दसरा मेळाव्यापासून सध्या भाजपने चार हात अंतर राखणे पंसत केले आहे. हा मेळाव्या यशस्वी होण्यासाठी शिंदेंनी आपल्या कार्यकर्त्यांना गर्दी जमविण्याचे टार्गेट दिले आहे. राज्यभरातून हजारो बस त्यासाठी बुक केल्याचे समजते. या मेळाव्याच्या माध्यमातून शिंदेंच्या स्वबळाची एकाअर्थी चाचपणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शिंदे आणि भाजप दोघेही एकमेकांपासून दूर असल्याचे समजते.देवेंद्र फडणवीस किंवा अन्य कोणत्या भाजपच्या नेत्याला शिंदे यांनी दसरा मेळाव्यास बोलावले, तर त्याच्याच बातम्या होण्याची शक्यता आहे. माध्यमेही त्याच बातम्या उचलतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला शिंदे या मेळाव्यातूनही उत्तर देऊ शकतात. हे पाहता या मेळाव्याच्या फोकस फक्त एकनाथ शिंदे ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.भाजपचे नेते नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावतात. यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर मंत्रीही नागपुरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेही भाजपची नेते मंडळी शिंदे यांच्या दसरा मेळाव्यापासून दूर असल्याचे समजते.एकीकडे भाजपने शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यापासून चार हात अंतर राखले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी केलीय. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजेरी लावू शकतात. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून काँग्रेस शिवसेनेपासून चार हात फटकून वागत आहे. मात्र, राष्ट्रवादीने पूर्वीपासून शिवसेनेची जोरदार पाठराखण केलीय. आता दसरा मेळाव्यातही तेच दिसून येत आहे.
भाजप नेत्यांना निमंत्रण नाही:दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे स्वबळ आपली ताकद आजमावणार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق