कर्नाटक: ( मायासांद्रा) काँग्रेसची भारत जोड यात्रा सुरू आहे. आज या यात्रेचा ३१ वा दिवस आहे. शनिवारी कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी आरएसएस आणि वीर सावरकर यांच्यावर निशाना साधला. “मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते. स्वातंत्र्यलढ्यात भाजप कुठेच नव्हता, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली. स्वातंत्र्य लढ्यात भाजप कुठेही नव्हता, भाजप ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही. काँग्रेस आणि त्यांचे नेते स्वातंत्र्यासाठी लढले आहेत."आम्ही फॅसिस्ट पक्ष नाही. आमचा पक्ष संवादावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे,सध्या निवडणूक जिंकण्यासाठी संघ म्हणून काम करावे लागेल, हे आम्हाला माहीत आहे. देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्यांशी आम्ही लढणार आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आताच बोलायचे नाही. "काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढणार्या दोन्ही उमेदवारांची स्वतःची भूमिका आहे तसेच त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन आहे. कोणालाही 'रिमोट कंट्रोल' म्हणणे हा दोघांचा अपमान आहे.काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे. आज यात्रेचा ३१ वा दिवस आहे. आज शनिवारी कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली. राहुल गांधी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत काग्रेसचे हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे आज यात्रेचा 31 वा दिवस आहे आज शनिवारी कर्नाटकातील तुम कुरू येथील माया सांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली राहुल गांधी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहे कर्नाटकात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या.काँग्रेसच्या ट्विटर अकाउंट वरून भारत जोडो यात्रेचा व्हिडिओ शेअर केला आहे यात सोनिया गांधी यात्रेत सहभागी झाल्याचे दिसत आहे भारत जोडो यात्रेला आईचा आशीर्वाद, जनतेचा पाठिंबा मिळत आहे आम्ही देशवासीयांना वचन देतो की ही यात्रा परस्पर सौहार्द बंधुभाव वाढवण्याबरोबरच ज्वलंत मुद्दे मांडेल अशी माहिती दिली आहे
स्वातंत्र्यलढ्यात भाजपा कुठेही नव्हती ; सावरकरांना इंग्रजाकडून मिळत होते मानधन ...राहुल गांधी
Hanuman Sena News
0
إرسال تعليق