खामगाव: २९ आक्टोंबर रोजी अमृत नगर खामगाव येथे भव्य विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यालय लोकार्पण सोहळा व दिपावली मिलन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष रा.स्व.संघाचे मा.जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, विश्व हिंदू परिषद केंद्रीय महामंत्री मा. मिलिंद जी परांडे तसेच विशेष प्रमुख उपस्थिती खामगाव विधानसभा आ.आकाशजी फुंडकर विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री विदर्भ राजेश्वर जी निवल, रामयनाचार्य गुरुवर्य संजय महाराज पाचपोर ,विहिंप क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंगजी राजे,क्षत्रीय मठ मंदिर प्रमुख अरूनजी नेटके,भाजपा मा.आ.चैनसुख संचेती, प्रांत मंत्री गोविंदजी शेंडे ,बजरंग प्रांत संयोजक अमोलजी अंधारे,जिल्हा पालक बापूसाहेब करंदीकर ,जिल्हा अध्यक्ष राजेशजी झापर्डे तसेच शहरातील व्यापारी हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ,स्वयंसेवक, परिसरातील नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते.
खामगाव येथे विहिंप जिल्हा कार्यालयाचे थाटात उद्घाटन..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق