Hanuman Sena News

बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका शेतकरी चिंतेत सोयाबीनचे नुकसान...


 बुलढाणा:  जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे कारण या पावसामुळे सोयाबीन पिकाचा नुकसान झाले आहे.राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी मात्र, चिंतेत आहेत. कारण या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे, सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे, अशातच पावसानं हजेरी लावण्यानं पिकांचे नुकसान होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून,पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन या पावसामुळं पूर्णतः भिजलं असून, याचा मोठा  शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातही या पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे.सोयाबीनसह , कापसालाही फटका  बसला आहे.बुलढाणा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र पावसाचा जोर वाढला आहे. शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, बुलडाणा आणि चिखली या तालुक्यात पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन पूर्णतः भिजलं आहे. यामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकलसान झालं आहे. या पावसानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असून, बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शेतातील पिकं काढणीच्या वेळेसच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळं हाताशी आलेली पिकं वाया जात आहेत. सध्या सोयाबीन आणि कापसाची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे. अशातच पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे.

Post a Comment

أحدث أقدم