ऐन दिवाळीत बच्चे कंपनीला चक्क रेनकोट घालून फटाके उडवावे लागण्याची शक्यता आहे. कारण या काळात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाखा महाराष्ट्राला बसणार आहे.बंगालच्या उपसागरात 20 आणि 21 ऑक्टोबरपर्यंत सीतरंग' चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता असून, महाराष्ट्रावर 23 व 24 रोजी हे वादळ घोंगावणार आहे. त्यामुळे पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.सीतरंग चक्रीवादळाचे मार्गक्रमण कसे असेल, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या वादळाचा परिणाम म्हणून 23 आणि 24 ऑक्टोबरला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. दिवाळीचा सण तोंडावर असून हिवाळा हंगामही सुरू झाला. मात्र, महाराष्ट्रात पाऊस थांबता थांबत नाही. आता याच पावसाचा ऐन दिवाळीत जोर असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.परतीच्या पावसाचा धुमाकूळ:आज कोकण, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता; पिकांचे मोठे नुकसान कोकणमध्ये आज महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिण भाग विदर्भात तुरळ ठिकाणी वीज व मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तम अंदमान समुद्रालगत 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. गुरुवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्यकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.चक्रीवादळ आणि पाऊस या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. सध्या एकीकडे राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार होत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे राज्यात दमदार पाऊस झाला आणि पुणे जिल्ह्यातील पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले तर राज्यातही अतिवृष्टीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे
दिवाळीत रेनकोट घालून उडवावे लागणार फटाके:बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची मुसळधार पावसाचा अंदाज...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق