लोणार : पावसाने सोयाबीन कापूस यासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे पंचनामे नाही नुकसान भरपाई नाही दुसरीकडे शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी सोयाबीनला साडेआठ हजारावर कपासाला साडेबारा हजारांवर भाव मिळावा यासह प्रमुख मागण्यांसाठी आता लढा उभारणार आहे सहा नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे भव्य एल्गार मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सगळे शेतकरी आपण एकत्र येऊया असा नारा आम्ही दिला आहे लोणार तालुक्यात गावोगावी शेतकऱ्यांच्या भावना त्रिव असल्याचे दिसून येत आहे मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची ग्वाही शेतकरी देत आहेत त्यामुळे एल्गार मोर्चा रेकॉर्ड ब्रेक होईल अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिले एल्गार मोर्चा च्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर 18 ऑक्टोबर रोजी लोणार तालुका दौऱ्यावर होते.यादरम्यान दुपारी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकरी दूधवाले शेतकरी एकत्र येऊन आंदोलन करून भाव मिळवून घेतात परंतु सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संख्येने मोठे असूनही एकत्र येत नाही ही शोकांतिका आहे मात्र आता आम्ही पक्ष राजकारण बाजूला ठेवून शेतकरी एकत्र येत आहोत पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान केले आहेत्यांचे पंचनामे अद्याप झालेले नाही शासनाने जाहीर केलेले नुकसान भरपाई अत्यंत तुकडी असून कोणतीही मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही आता त्यात सोयाबीनचे दर पडले आहेत सोयाबीनच्या एक क्विंटल मागे खर्च 5783 रुपये आहे मात्र सध्या भाव 4000 पर्यंत आहे कापसाला क्विंटल मागे 8184 रुपये खर्च तर भाव सात हजार पर्यंत आहे यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही विरोधक सोयाबीन कापसावर बोलायला तयार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी सोयाबीनला किंमत प्रति क्विंटल आठ हजार रुपये सातशे रुपये आणि कापसाला प्रतिक्विंटल 12 हजार 700 रुपये भाव स्थिर राहावा यासाठी डीओसी ला प्रोत्साहन द्यावे. मागील वर्षी आयात केलेल्या पाच लाख मेट्रिक टन सोहळा पेंडला डिसेंबर पर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी मार्केट स्थिर राहण्यासाठी सोया पेंड आयात करणार नाही हे जाहीर करावे यंदा पंधरा लाख मॅट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी. सोयाबीनचे वायदे बाजारावरील बंदी उठवावी खाद्यतेलावरील आयात शुल्क 30 टक्के करावे कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे कापूस वसुत निर्यादीला प्रोत्साहन द्यावे पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी या मागण्या राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मांडून पाठपुरावा करावा असा आमच्या मागण्या असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी दिली यावेळी शेतकरी चळवळीतील सहदेव लाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा शेतकरी म्हणून एकत्र या ... रविकांत तुपकर
Hanuman Sena News
0
إرسال تعليق