राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी मात्र ‘एबीपी माझा’शी बोलताना हे वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याची माहिती मिळत आहे. आयागोसमोर आपली बाजू भक्कपणे मांडण्यासाठी ठाकरे गटाने तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रं जमा केली होती.देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिला निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचं कोणतेही प्रतिज्ञापत्र लागत नाही एखाद्या पक्षाला मान्यता देणे किंवा चिन्ह देणे याचे नियम ठरलेले आहेत गेल्या वीस वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत कोणाचे रद्द झालेत कोणाचे टिकेल हे सगळं स्वतःच्या समाधानासाठी चाललेलं आहे असं फडणवीसांनी सांगितलं.निवडणूक आयोगाने आपल्या या संदर्भात कोणतीही माहिती दिली नसल्याचं ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी आपण आयोगाने दिलेल्या फॉर्मेट नुसारच प्रतिज्ञापत्र दिली असून हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे
ठाकरे गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق