Hanuman Sena News

दिव्यांग फाउंडेशन तर्फे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती यांच्या निमित्त दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व शाखा स्थापन सोहळा उत्साहात संप्पन्न...



 मलकापूर : 2 आक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या निमित्त  दिव्यांग फाउंडेशन तर्फे वाघुड गावातील दिव्यांग बंधू बघीनींना येणाऱ्या अडचणी वर मार्गदर्शन  करण्यात आले होते. सदर कार्यक्रम मध्ये 15 ते 20 दिव्यांगानी या मार्गदर्शन शिबिरात  भाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा ना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.निलेश भाऊ चोपडे यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले होते. व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे यांचेही पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले 
 प्रमुख पाहुणे म्हणून वाघुड येथील शाळा समितीचे अध्यक्ष सोपान भाऊ महाले उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. पंकज मोरे  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भाऊ सनिसे यांनी केले.आणि व  येथे दिव्यांग फाउंडेशन ची महाराष्ट्रातील पहिली शाखा स्थापन झाली. या शाखेचे गाव प्रमुख म्हणून अशोक भाऊ सनिसे तर गाव उपप्रमुख म्हणून रोशन भाऊ तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश भाऊ चोपडे, सचिव,शेख रईस सदस्य,जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे,अंकित नेमाडे, जिल्हा सचिव शरद खूपसे,सदस्य विष्णु इंगळे, नवनिर्वाचित गाव प्रमुख अशोक भाऊ सनिसे, गाव उपप्रमुख रोशन तायडे,व असंख्य दिव्यांग बंधू भगिनी हजर होते यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेशभाऊ चोपडे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Post a Comment

أحدث أقدم