मलकापूर बोदवड रस्त्यावर घाणखेड फाट्याजवळ ॲम्बुलन्स व रिक्षाचा गंभीर अपघात झाला त्याच रस्त्याने परतीच्या प्रवासाला हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप हे बोदवड वरून मलकापूर कडे येत असताना हा भीषण अपघात झाल्याचे त्यांना दिसले रुग्णवाहिकातील पेशंट जळगाव वरून वाशिम कडे जात असताना ऑटो आणि ॲम्बुलन्स याच्यामध्ये भीषण अपघात झाला अशावेळी देवदूत बनून हनुमान सेनेचे अमोल भाऊ टप यांनी रुग्णवाहिकेतील पेशंटची प्रकृती गंभीर झालेली दिसली अशा अवस्थेत त्यांनी मलकापूर होऊन हनुमान सेनेची ॲम्बुलन्स ला घटनास्थळी पाचारण होण्यास भ्रमणध्वनी द्वारे सांगितले
त्या पेशंटला दुसऱ्या रुग्णवाहिकेतुन वाशीमला रवाना केले पण रस्त्यावर येणारे जाणाऱ्या लोकांमध्ये संकटकाळी मदत करण्याची भूमिका नसते अशाच वेळी देवदूत बनवून अमोल भाऊ टप व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑटो चालक व रुग्णवाहिकेतील पेशंट यांना वेळीच दवाखान्यात रेफर करून एक आपुलकीचा संदेश दिला ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध करून त्यांना वाशिम येथे त्यांच्या गावी पाठवले त्यावेळी हनुमान सेनेचे वीरेंद्र कासे, गणेश रोठे ,सचिन कापसे, गणेश बोराडे , शिवा माताळे ,अमोल ढेकळे, यांच्या सहकार्याने त्या एक्सीडेंट झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा जीवदान मिळालं
إرسال تعليق