बुलढाणा (नांदुरा) : २१ ऑक्टोंबर म्हणजेच पोलीस स्मृतिदिन होय. देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.याच स्मृतिदिनाचे औचित्य साधून अजित इंटरनॅशनल स्कूल व जुनिअर कॉलेज येथील विद्यार्थी, शिक्षक वृंद, व इतर कर्मचारी यांनी नांदुरा पोलीस स्टेशन येथे भेट दिली. सर्वांच्या २४ तास सेवेत असलेला संपूर्ण पोलिसदल आपले कर्तव्य कशाप्रकारे बजावतात या बाबतची संपूर्ण माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तसेच तुरुंगवास, रायफल, बंदुक, जिल्हा पोलीस सोबत होणारे महत्त्वाचे संदेशवहन यांच्या विषयी माहिती देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी पोलीसदलाने दिलेली माहिती कुतूहलतेने ऐकून नवीन ज्ञान आत्मसात केले. अजित इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच कर्मचारी वर्ग यांच्या कडुन आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच निस्वार्थीपणे जनतेसाठी २४ तास सेवा पुरवणारे पोलीस-निरीक्षक,भूषणसर गावंडे प्रफुल्लसर गाडेकर,सहाय्य्क पोलिस निरीक्षक अरुणसर खुटाफडे, दिलीपसिंग राजपूतसर,अनिलसर सिरसाठ देविदाससर चव्हाण, कैलाससर सुरकड अमोलसर राउत, महादेवराव धंदरे, संजयसर पडघान, अमोलसर राऊत यांच्यासह उपस्थित सर्व पोलीस दलाला सलाम (सॅल्यूट) करून संपूर्ण पोलीस दलाला त्यांच्या अविरत चालु असलेल्या कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. या सोबतच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पोलीस वर्गाचा सत्कार करून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसदलाला विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाशकंदील,फराळ देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
إرسال تعليق