Hanuman Sena News

पालकांनो लहान मुलांना चॉकलेट देताय सावधान ; चॉकलेट घशात अडकून बालकाचा मृत्यू..



धाड (जि. बुलढाणा): येथील एका पाच वर्षीय मुलाचा चॉकलेट खाताना ते श्वसन नलीकेत अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. धाड येथील ग्रामीण रुग्णालयात या बालकास उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.शेख याहीया असे मृत पावलेल्या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. धाड येथील शेख अजीम यांचा तो मुलगा होता. शेख अजीमचे कुटूंब मोलमजुरी करून सामान्य परिस्थितीत जगत आहे. शेख अजीमचा पाच वर्षाचा मुलगा शेख याहिया हे नेहमीप्रमाणे चॉकलेट खात होता. यादरम्यान ते त्याच्या श्वसन नलिकेत अडकले. त्यामुळे शेख याहिया यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.ही बाब कुटुंबियाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्वरित त्यास धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केली. या घटनेमुळे धाड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم