भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय हवाई दलात स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आज सामील होणार आहेत. जोधपूरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. ही स्वदेशी जोधपूर सीमेजवळ तैनात करण्यात येतील. 'मेक इन इंडिया' उपक्रमाअंतर्गत भारत स्वदेशीवर भर देत आहे. त्या दृष्टीने ह महत्त्वाचं पाऊल आहे. भारतीय संरक्षण दलात आज 10 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत. यातील पाच हेलिकॉप्टर सैन्य दलात आणि पाच हवाई दलात सेवेत असतील.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात माहिती दिली होती. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, 'स्वदेशी बनावटीचं पहिलं लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर हवाई दलात सामील होणार आहे. यासाठी मी 3 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे उपस्थित असेन. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.'
भारतीय हवाई दलात नवीन योद्धा सामील पहिलं स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर सैन्य दलात दाखल...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق