नवी दिल्ली : देशाच्या संपर्कक्षेत्रात क्रांतिकारी ठरणाऱ्या ‘५जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीच प्रणाली आहे. विशेष म्हणजे ही ‘५जी’ प्रणाली वापरून पंतप्रधानांनी परदेशात गाडीही चालवली. भारतीय मोबाइल परिषदेच्या (आयएमसी) व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘५जी’ प्रणालीचे उद्घाटन केले. ‘‘या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे,’’ असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘‘आज १३० कोटी भारतीयांना ५जीच्या रूपात एक सुंदर भेटवस्तू मिळाली आहे. यामुळे अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत,’’ असे मोदी म्हणाले.‘५जी’ प्रणालीचा वापर करून पंतप्रधानांनी युरोपमध्ये गाडी चालवली. गाडी स्वीडनमध्ये होती, तर तिचे नियंत्रण ‘आयएमसी’मधील एरिक्सन कंपनीच्या मंडपात होते. पंतप्रधानांनी तिथे बसून हजारो किलोमीटरवर असलेली गाडी चालवली. यानिमित्ताने ‘५जी’ प्रणालीच्या वेगाची चाचणी घेतली ५जी सेवेच्या रूपाने आपण सर्व समावेशक डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे अशी प्रति क्रिया सीआयडी चे अध्यक्ष संजय बजाज यांनी व्यक्त केली तर अति वेगवान इंटरनेट शिक्षण आरोग्य आणि शेती सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये क्रांतिकारी संशोधनासाठी उपयुक्त ठरणारे आहे असे 'असोचेमा 'चे महासचिव दीपक सूर्य म्हणाले फिक्कीचे अध्यक्ष संजीव मेहता यांनी आता देशात व्यवसाय करणे आणि जगणे सोपे होणार आहे असं सांगितले.भारतीय एअरटेल ने मुंबई दिल्ली मंगरूळ आणि वाराणसी सह आठ शहरांमध्ये लगेच सेवा सुरू करण्यात आल्याचे जाहीर केले. आघाडीच्या रिलायन्स जिओनी चार महानगरामध्ये याच महिन्यात सेवा सुरू होईल असे जाहीर केले.' वडाफोन - आयडिया' ने मात्र अद्याप तारीख जाहीर केलेली नाही .'जिओ'ने डिसेंबर 2023 पर्यंत तर 'एअरटेल' ने मार्च 2024 पर्यंत संपूर्ण देश ५ जी च्या जाळ्यात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले. 2जी,3जी,4जी,प्रणाली साठी आपल्याला अन्य देशावर अवलंबून राहावे लागत होते. संपूर्ण स्वदेशी बनावटीची 5 जी प्रणाली विकसित करून भारताने इतिहास घडवला आहे.4जी पेक्षा5जी दहा पटीने वेगवान राहणार आहे.असा फरक राहीलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘५जी’ प्रणालीचे उद्घाटन केले. ‘‘या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق