मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑक्टोबरला देशातील 13 शहरांमध्ये 5G नेटवर्क सेवा सुरू करण्यात आली जलद गतीच्या इंटरनेट आणि वेगवान कामांसाठी ही सेवा सर्वांसाठीच उपयोगी ठरणार आहे 5G सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही या सेवेच्या जाहिराती करीत आहेत याचाच फायदा आता काही चोरटे घेत आहेत 5G च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचे काही प्रकार छत्तीसगड राज्यातून समोर आले आहेत 5G सेवा अजूनही देशात सर्वत्र सुरू झालेले नाही मात्र या सेवेच्या नावाखाली फसवणूक सुरू झाली आहे छत्तीसगड मधील काही नागरिकांना 5G सेवा सुरू करून देतो म्हणून फोन आले फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मोबाईल वरील ओटीपी विचारला हा ओटीपी समोरच्या व्यक्तीला सांगताच त्याच्या खात्यातील पैसे काढून घेण्यात आले त्यामुळे भविष्यात तुम्हाला फोनवरून ओटीपी विचारल्यास चुकूनही तो सांगू नका. किंवा शेअर करू नका कारण टेलिकॉम कंपनी असो किंवा बँक असो कोणीही ओटीपी मागत नाही त्यामुळे कोणालाही ओटीपी शेअर करू नका
टेलिकॉम कंपनीतून बोलतोय असा खोटा कॉल येतो 5G सेवा सुरू करून देतो असं सांगितलं जातं
त्यासाठी मोबाईलवर येणारा ओटीपी मागितला जातो
एकदा का ओटीपी शेअर केला की आपल्या खात्यातून पैसे काढले जातात
दरम्यान देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे यामध्ये दिल्ली, मुंबई, आमदाबाद, बंगरूळ ,चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकत्ता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे दोन वर्षानंतर फाईव्ह जी सेवेचा देशभरात झपाटाने विस्तार केला जाईल या सेवेने देश सुपरफास्ट होऊन लोकांना जलद गतीने इंटरनेट उपलब्ध होईल भारतावर 5G चा एकूण आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत असण्याचा अंदाज आहे 4G च्या तुलनेत 5G नेटवर्क अनेक पटीने जलद गती देतो 5G सेवेच्या रिचार्ज साठी किती पैसे मोजावे लागणार याबाबत माहिती अद्यापही समोर आलेली नाही मात्र तंत्रज्ञानाच्या माहितीनुसार सुरुवातीला 5G साठी 4G इतकीच किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र टेलिकॉम कंपन्या 5G च्या किमतीत वाढ करतील असा अंदाज मानला जातोय 5G सेवा आज जरी लॉन्च केली जाणार असली तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र या सेवेसाठी ग्राहकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे एअरटेल आणि जिओ यांच्याकडून 5G सेवेला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.
إرسال تعليق