'एनआयए'ने छापे टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली. त्याविरोधात पुण्यात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचले पाहिजे. अशाप्रकारची झणझणीत टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.'पीएफआय'विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल आंदोलन करण्याचे करण्यात आले. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप होतोय. मात्र, पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.राज ठाकरेंनी एक पत्र पोस्ट करत याबाबत आपला निषेध व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचे समर्थन करत जर या पीएफआय कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत. असा सणसणीत इशारा राज ठाकरे यांनी दिला राज ठाकरे पुढे म्हणाले माजी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील 'पा'उच्चारता येणार नाही नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदूंच्या मुठ्ठी जर आवडला तर यांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका या सगळ्यांनी उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.
PFI कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर पाकिस्तानात चालते व्हा...राज ठाकरे
Hanuman Sena News
0
إرسال تعليق