Hanuman Sena News

देशभरात PFI च्या ठिकाणांवर NIA,ED चे छापे; १०६ जण अटकेत...

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह १० राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एनआयए आणि ईडीने या राज्यांमधील पीएफआयच्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली. या कारवाईत तपास यंत्रणेने आणखी १०६ जणांना अटक केली आहे.एनआयएची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, ज्याअंतर्गत पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादाला निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथीय बनवणे, यात गुंतलेल्या व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येत आहे.पीएफआय ही अत्यंत वादग्रस्त संस्था आहे. या संस्थेचे महाराष्ट्रातील पुण्यात पुणे जिल्ह्यामध्ये हब असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाकडून इतर यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी जमियत उलेमा ए हिंदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाकडून इतर यंत्रणांना अलर्ट दिला आहे.एनआयएने तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेंकासीसह अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांची झडती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई पीएफआय स्टेट हेड ऑफिस पुरसावक्कम येथेही झडती घेण्यात आली आहे. एनआयए आणि ईडीने पीएफआयचे अध्यक्ष ओमा सलाम यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथे मध्यरात्रीपासून छापे टाकले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم