Hanuman Sena News

महाविद्यालयातच होणार जात प्रमाणपत्र पडताळणी...

बुलढाणा: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारी जात प्रमाणपत्र पडताळणी आता प्रत्येक महाविद्यालयातच होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आधी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. हे ऑनलाई अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अधिकारी महाविद्यालयात येऊन करणार आहेत.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कर्मचारी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज स्विकृती करणे, त्यामधील तृटी पुर्तता आणि ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संबंधित कर्मचाऱ्यासाठी १३ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत तालुकानिहाय अर्ज स्विकृतीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी, कर्मचारी तालुकानिहाय महाविद्यालयात जाऊन अर्ज स्विकृतीचे कार्य करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा आता महाविद्यालयातच जात प्रमाणपत्र पडताळणी होणार असल्याने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अकरावी आणि बारावीत विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी तसेच इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी गेलेल विद्यार्थ्यांनी आपले अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर भरून त्याची प्रत घ्यावी. या प्रतीसोबत मुळ आवश्यक कागदपत्रांसह तयार ठेवण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم