पुणे:- जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका झोमॅटो डिलिव्हरी बॉय ने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना 17 सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास येवले वाडीत घडली आहे. तरुणीने संबंधित डिलिव्हरी बॉयला पाणी प्यायला दिल्यानंतर त्याने तिला थँक्यू म्हणत गालाचे चुंबन घेतले. रईस शेख वय 40 राहणार कोंढवा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉय चे नाव आहे. याप्रकरणी तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी येवले वाडीत राहायला असून तिने 17 सप्टेंबरला झोमॅटो वर खाद्यपदार्थाची ऑर्डर दिली होती. त्यामुळे रईस जेवणाची ऑर्डर घेऊन त्या ठिकाणी गेला त्यावेळी त्याने तरुणीला पाणी मागितले ते पाणी दिल्यानंतर धन्यवाद म्हणायचा बहाना करीत त्याने तरुणीला जवळ ओढुन चुंबन घेतले. याप्रकरणी कोंढवा पोलीसांनी संबंधित झोमॅटो कंपनी प्रशासनासोबत संपर्क केला असता तो झाला नाही. तसेच संबंधित डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले आहे पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहे
झोमॅटो डिलिव्हरी बॉयने केला तरुणीचा विनयभंग...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق