विशेष प्रतिनिधी
भारताचे विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीपर्यंत भाजपाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या अंतर्गत मलकापूर शहर ,तालुका भाजपा व महिला आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टी ने आज दिनांक 23 /9 /2022 रोजी 10 वा. दाताळा येथे गजानन महाराज मंदिराजवळील पटांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मा.जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे ,भाजपा जिल्हा नेत्या अर्चनाताई शुक्ला ,दाताळा येथील भाजपा ज्येष्ठ नेते ऐ.के. पाटील साहेब, सरपंच पूजाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य केदार भाऊ एकडे, तालुका अध्यक्ष संजय भाऊ काजळे, शहराध्यक्ष मिलिंद भाऊ डवले, विदर्भ जैन प्रकोष्ठ महासचिव डॉक्टर योगेश पटनी,शहर उपाध्यक्ष संतोष भाऊ बोंबटकर,दाताळा उपसरपंच अमोल शिरसाट ,माजी उपसभापती पंचायत समिती आनंद भाऊ शिरसाट, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, सुनील देशमुख, सचिन चौधरी, सौ.चंद्रकला पाटील, नूरजाबी शेख खलील,दत्ताभाऊ प्रधान, संतोष राऊत, सुरेंद्र ठाकूर ,अजय तायडे, चंद्रशेखर तायडे ,केशव गारमोडे, देवेन टाक ,योगेश काजळे, प्रवीण पाटील, विशाल पाटील आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी भाजपा मलकापूर शहर, तालुका, महिला आघाडी व दाताळा ग्रामस्थ उपस्थित होते.
إرسال تعليق