बुलढाणा : जिल्ह्यातील पोस्ट खात्यात आता ई-पोस्ट सेवा मार्फत संदेश पाठवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .पोस्ट ऑफिसच्या ई-पोस्टमार्फत फक्त १० रुपयात संपूर्ण भारतात कुठून कुठेही संदेश पाठवता येईल. या सेवेमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना शुभेच्छा संदेश पाठवता येईल.तसेच आपल्या परिजनांचा वाढदिवस ,गणेशोत्सव ,दसरा, दिवाळी ,नवीन वर्ष शुभेच्छा संदेश देता येणार आहे .कंपनी फॉर्म संस्था करिता विशेष दरात सवलत देण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिस बुलढाणा विभागातील सर्व उप आणि मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये ही पोस्ट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई -पोस्ट चा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बुलढाणा डाग विभागाचे अध्यक्ष राकेश येलामल्ली यांनी केले आहे.
पोस्ट खात्यात ई-पोस्ट सेवेमार्फत संदेश पाठवण्याची सुविधा...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق