Hanuman Sena News

माझ्या मतदार संघात भाजपाशी युती नको... अब्दुल सत्तार



शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर आगामी सर्व निवडणुका शिंदे गट आणि भाजपा युतीत लढेल असं दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी अनेकदा सांगितलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको,” असं मोठं विधान केलं आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असताना अब्दुल सत्तार यांनी केलेल्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.अब्दुल सत्तार म्हणाले, “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू.” दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे दिल्लीत आणि मुंबई सह जिल्ह्यात महापालिकेत जिल्हा परिषदेत सोबत राहू स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचाच कार्यकर्ता असेल मला कुत्र निशाणी दिली तरी मी निवडून येईल निवडणुकीतील चिन्ह आणि आपल्या मतदार संघातील आपली ताकद यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्र निशाणी दिली तर मी निवडून येईल कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही कार्यकर्ता पद कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आमदार खासदार मंत्री पद निघून जाईल आणखी काही पद असतील ती जातील पण कार्यकर्ता हे पद कधी जात नाही जसं जसं काम केलं की त्याला जनतेची ताकद मिळते आशीर्वाद मिळतो त्यामुळे राजकारणाच्या ट्रॅकवर कितीही गतिरोधक आले तरी गाड्या सर्व मुंबईपर्यंत जातात दुसरीकडे जनता जनार्दनाने स्वीकारलं नाही तर फालतूभर वखारावरही कोणी ठेवत नाही .असंही अब्दुल सत्तार यांनी नमूद केलं

Post a Comment

أحدث أقدم