__
योगेश काजळे
विशेष प्रतिनिधी
_भारताचे विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीपर्यंत भाजपाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या अंतर्गत नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ उमाताई खापरे, मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ. सिंधुताई खेडेकर, श्री चैनसुख संचेती, नांदुरा शहराध्यक्ष श्री श्यामभाऊ राखोंडे यांच्या मार्गदर्शनात व जेष्ठ समाजसेविका तथा शहराध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांच्या कार्यक्षम नेतृत्वात एक दिवशीय सामाजिक उपक्रम या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन आज बुधवार दि. 21/09/2022 रोजी शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येथे करण्यात आले होते._
_या कार्यक्रमाच्या अंतर्गत पुढील लोकोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले._
_कोविड लसीकरण बूस्टर डोस मोहिम -_
_भावी काळात कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढल्यास पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये व नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून नांदुरा शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी कोविड लसीकरण बुस्टर मोहिम आयोजित करून त्याअंतर्गत नागरिकांना बुस्टर डोस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवेचा लाभ घेऊन अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास पुढाकार घेतला._
_मोफत ई-श्रमिक कार्ड शिबिर -_
_नांदुरा शहरात आजही अनेक मजूर-कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करीत असून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत ई-श्रमिक कार्ड शिबिर राबविण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजूंना ई-श्रमिक कार्ड मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले._
_मतदान - आधार जोडणी शिबिर -_
_निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार नागरिकांना आधार क्रमांक मतदार यादीशी जोडणे बंधनकारक असून याच अनुषंगाने या एकदिवसीय सेवा कार्यक्रमांतर्गत मतदार-आधार शिबिर यशस्वीपणे राबविण्यात आले. या शिबिरामध्ये शहरातील अनेक नागरिकांनी सहभागी होऊन आधार क्रमांकाची मतदार यादीशी जोडणी करून घेतली._
_यावेळी माजी नगरसेवक श्री सुधीरभाऊ मुर्हेकर, भाजपा जेष्ठ नेते श्री मुकेशभाऊ डागा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री बंटीभाऊ फणसे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री राजेशभाऊ डागा, भाजपा नांदुरा शहर सचिव श्री ब्रह्मानंदभाऊ चौधरी, नांदुरा सोशल मीडिया संयोजक श्री सागरभाऊ धामोडे, बुथप्रमुख श्री गणेश भाऊ राखोंडे, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका सौ.ज्योतीताई तांदळे, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ.जयश्रीताई पिंपरे, भाजपा महिला मोर्चा नांदुरा शहर संयोजिका सौ. रेणूताई डागा, सौ. पुजाताई राखोंडे, सौ. लिलाबाई इंगळे यांसह इतर सर्व भाजपा सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी महाराणा मंडळचे सर्व सदस्य त्यामध्ये श्री अक्षयदादा घन, स्वयंसेवक संघाचे श्री राहुलभाऊ राखोंडे, बंटीदादा, माही, बजरंग दलचे विशाल भाऊ धंगेकर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सेवाभावी योगदान दिल्याबद्दल नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने लसीकरण टीम नांदुरा व संत निरंकारी सत्संग भवन सदस्य मंडळ यांचे आभार मानण्यात आले._
_सामाजिक कार्यांत सदैव अग्रेसर असलेल्या प्रतिष्ठीत समाजसेविका सौ. सारिकाताई डागा यांच्या संकल्पनेतून वरील विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून अविरतपणे चालणाऱ्या त्यांच्या या सामाजिक उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांना मोलाची मदत होत असल्याची भावना नांदुरा शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
إرسال تعليق