पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह कार्य केल्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली होती. या प्रकरणावरून बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आज सकल मराठा समाज व शिवछत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळ यांच्या वतीने दिनांक १६/०९/२०२२ रोजी माननीय दुर्गेश भाऊ राजापुरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साहेब यांना आज निवेदन देण्यात आले. जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाल यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून मराठा समाजाच्या दुखावलेल्या भावनांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होईल. अन्यथा मराठा समाजाच्या धैर्यांचे बांध फुटण्यास वेळ लागणार नाही. त्यावेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याकरिता सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. तसेच पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्यावर कारवाई झाली नाही तर छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळ व सकल मराठा समाज बांधव मलकापूर यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी दुर्गेश भाऊ राजापुरे, चेतन जगताप, राम घुले, चेतन खैरे, पंकज जगताप, यशवंत थोरबोले, विशाल घुले ,आशिष चुनाडे, कार्तिक हुंबे,गौरव साळुंखे, जय मगर, महेश खैरनार, अक्षय कदम, सुधीर घुले, राजेंद्र डोफे, कैलास दुर्गुळे, प्रताप थोरबोले, विनोद काळे, अविनाश जगताप, गणेश वाळतकर, गणेश जगताप, स्वप्नील तारकासे ,मयूर भोईटे, रुद्र सूर्यवंशी, गणेश हुंबे,ईश्वर कडाले, निखिल भोसले, मंगेश जगदाळे, प्रशांत गाडेकर, आकाश शिंदे, गौरव खैरनार, संतोष गुजर ,राहुल घोंगटे इत्यादी समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते
पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांना कठोर शिक्षा करावी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق